Tuesday, May 11, 2010

फतेहपुर-सीक्री सहल..

फतेहपुर-सीक्री सहल..

काहींनी 'यात काय मोठेसे?' असे म्हणून नाके मुरडली. ते पाहून चाचाजी म्हणाले , 'मला भरीला घालून उड्या मारायला लावता व परीक्षा पहाता हे मला माहित आहे. असे 'बडबोले' मी रोजच पहातो. मला उड्या मारायला लावून त्यांना वाटते, 'पहा यडा कसा आमच्या तालावर नाचतोय. बरा बनवला!' ...

चाचा म्हणाले, 'लक्षात ठेवा, मी उड्या मारणारच होतो. तुम्ही म्हणालात तरी. नाही म्हणाला असतात तरी. माझ्या आनंदाचा, प्रेरणेचा तो भाग आहे'.

अनेक पर्यटक फतेहपुर सीक्रीच्या दमवणाऱ्या सहलीच्या शेवटच्या टप्प्यात होते. ग्रीष्मातील तळपणारा भास्कर शरीरीची काहिली करत होता.
शेवटी बुलंद दरवाज्यापाशी शीण घालवायला आपापले घोळके शोधत लोक बसकण मारुन होते.
तेवढ्यात "धडा...म्म" असा आवाज झाला. काहींचे लक्ष तेथून जवळील एका बावडीकडे गेले.
काय झाले? पहायला सगळे धावले. बावडीच्या काठाने जमा व्हायला लागले. वाकून वाकून पहाता पहाता त्या हेंडसाळणाऱ्या पाण्यातून एक हात वर आला. ... छातीभर दिसणारा हसरा चेहरा हात उंचावून लोकांनी वाजवलेल्या टाळ्याचे अभिवादन स्वीकारत चटपटीतपणे बावडीच्या कडेच्या पायऱ्यांनी चढून एका उंच ठिकाणी पुन्हा त्या बावडीच्या पाण्यात उडी मारायला सज्ज झाला.
कमावलेले शरीर, निथळणारे पाणी, लांब केसांची बुचडी करून पुन्हा उडी टाकण्याचे लोकांचे प्रोत्साहन स्वीकारत आणखी एकादा सूर मारला. "धडा...म्म" करून पाणी उसळले. पोहणाऱ्या वीराला हसत हसत पाण्याच्यावर आलेला पहायला सर्व जण अधीर झाले...

बावडी लांब रुंद होती. कठडा नव्हता. पाणी खूप खोल होते. काठावरील ख़ुरट काटेरी झुडपांच्या, कडुनिंबाच्या झाडांच्या सावलीच्या आसऱ्याने लोक गर्दी करून होते.
एका कंपुतील लोक झाडाच्या सावलीत मुंगफलीचा पुडा सांभाळत दाणे तोंडात टाकत सर्व पहात होते.
लस्सीच्या ठेल्यावरील काही गिलासात 'बरफ नको' असा आग्रह धरून होते.
तेवढ्यात धडाम्म... आवाज ऐकून 'क्या हुआ' करत नवे लोक धावले.
आपापसात चर्चा चालू झाली. ...
'कशाला अशी जीव घेणी कसरत करावी म्हणतो मी?' वृद्ध आवाज होता.
'या वयात काय उडी घेतोत भिती कशी वाटत नाही?'...एकीचा धास्तीपुर्ण आवाज.
'त्यात काय आहे विशेष!
'किती असेल हो उंची उडीची?'.. एकीने तिच्या ह्यांना विचारणा केली.,
'असेल ५०-६० फूट. जास्त नाही'.
'नक्कीच ७५ फुटापेक्षा जास्त असेल' आणखी एकांनी लगेच आपली फुटपट्टी लावली.
'नुसत्या उड्या मारतोय लेकाचा... पलटी मारून गिरकी घेतली तर खर... हे काय कोणीही मारेल!
मग तुम्ही मारा!' एकांचा टोमणा ...
'मारला असता पण ...
'मी कसा नदीला उफाण आलेले असताना, तीर दिसत नाहीत अशा पुरात उड्या मारण्यात पटाईत आहे. मी असल्या 'तळ्याटाईप 'पाण्यात उडी नाही मारत! कौतुकाने फुशारला गडी...
त्याच्याकडे कौतुकाने पहात मैत्रिणीने म्हटले, 'त्यांना पुरात उडी धालताना माझ्या काळजाच पाणी पाणी होत अगदी!... '
'एकांनी सुचवले अरे त्याला काही बक्षिशी द्या. तो इतकी दमणूक करतोय. आपण फक्त टाळ्या कुटून, वा वा म्हणतोय ... हे मला कसे तरी वाटतेय...
एकीने पर्सला हात घातला. पण तिला नाणी सापडेनात. बर नेमकी पाचशेची नोट हाती आली ती देववे ना...
'आमचे हे ना, समुद्रात काय पोहतात' आणखी एकीचे कौतुकाचे शब्द आले...
'धीर गंभी सागराचा घोंघावणारा आवाज, घडाडणाऱ्या लाटा, मासळीचा गंध अशा वातावरणात वाढलो आम्ही... असल्या बावेत पडायचे म्हणजे चाळणीत पाणी वाटतेय. यात कोण उडी मारतय?'...
'तोवर तो वर आला.
'काहो, हे किती खोल असेल पाणी?'
'नाही म्हणजे जितक्या उंचावरून हा उडी मारतोय त्यावरून तितके खोल नक्कीय असे नाही का?...
शंकेच्या सुरात काळजी होती....
एकांनी पाण्याच्या थंडाव्याची तक्रार करत म्हटले, 'काय आहे, मला आता प्रकृतीला मानवणार नाही अशी उडी.'
'मी फक्त टँक मधेच थर्ड लेव्हलवरून उडी घेते. इथे ना क्लोरीन, ना स्विमिंगच्या आधी बाथची सोय...'
'हो नाग, मीपण तेच म्हणते. कॉश्च्यूम नाही ना ग आणले...'

'बडबोले' आपापली गाऱ्हाणी गाऊन सोप्प काम करायला टाळत होते. तोवर आणखी एकदा धडा...म्म असा आवाज झाला. निथळत्या शरीराने वर येणाऱ्याला एकांनी आव्हान दिले..
'चाचजी, आप उधरसे मारीए ना जंप".... ते त्याने स्वीकारले. काहींनी त्याची हिम्मत पाहून उड्या मारल्या त्याच्या बरोबर. वर येऊन पहाणाऱ्यांच्या टाळ्या मिळवल्या. नवीन उड्या टाकणाऱ्यांच्या पाठीवर सराईतांची शाबासकीचा थाप पडली. पहाणाऱ्यांनी त्यांना गरा़डा घातला. काहींनी सही मागितली. काहींना हस्तांदोलनाची घाई झाली.
काहींनी 'यात काय मोठेसे?' असे म्हणून नाके मुरडली.
ते पाहून चाचाजी म्हणाले , 'मला भरीला घालून उड्या मारायला लावता व परीक्षा पहाता हे मला माहित आहे. असे 'बडबोले' मी रोजच पहातो. मला उड्या मारायला लावून त्यांना वाटते, 'पहा यडा कसा आमच्या तालावर नाचतोय. बरा बनवला!' ...
चाचा म्हणाले, 'लक्षात ठेवा, मी उड्या मारणारच होतो. तुम्ही म्हणालात तरी. नाही म्हणाला असतात तरी. माझ्या आनंदाचा, प्रेरणेचा तो भाग आहे'.
'तुम्हाला वाटत असेल की चाचाला बनवला म्हणून पण लक्षात ठेवा तुम्ही स्वतःलाच फसवताय. मला नाही. असेल हिम्मत तर घाला उडी. आव कशाला आणताय. असेल हिम्मत तर घाला उडी. वाट कशाची पहाताय?'
खडे बोल सुनावलेले टोळके आपल्याला तो म्हटलाच नाही असे करून मुंगफलीच्या पुड्याच्या कागदाचे बोळे करून वाटेत टाकत होते. एकांनी हातातील पुड्याचा कागदावर नजर मारली. त्यात म्हटले होते...
"मोगा- पंजाब - एक तर्कशील संस्थाद्वारा नाडीग्रंथों का रहस्य ढूंढने की कोशिश नाकाम"

No comments:

Post a Comment